सावरदरी उद्योग नगरीचे उपसरपंच संदिप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चाकण- सावरदरी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड तालुकाध्यक्ष संदिप पवार यांनी आपला वाढदिवस केक न कापता रक्तदान या सामाजिक उपक्रमामार्फत साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून राज्य सरकारने केलेल्या आवाहनला प्रतिसाद देण्यासाठी हे रक्तदान शिबीर घेण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात सरपंच भरत तरस यांच्या पासून करण्यात आली. यावेळी शिबिरात नागरिकांच्या रक्तदानातून ४० बॅग एवढे रक्तदान झाले. तरीही खूप नागरिकांचे रक्तदान कॅम्पचा कोठा पूर्ण झाल्यामुळे राहिले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पवार यांनी एक मास्क, वाफेचे मशीन आणि एक रोप भेट दिले. सध्या सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने प्रत्येकाने निदान एकतरी झाड लावण्याचा प्रयत्न करावा असेही यावेळी नागरिकांना पवार यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी युवा उद्योजक सोमनाथ तरस, संदिप गाढवे,उत्तम शेटे, श्री हरि सोनवणे नवनाथ शेटे, प्रताप बुचूडे, संजय बुचूडे, मच्छिंद्र शेटे, महेश खलाटे, संदिप मोरे, मिथुन शिंदे, काळुराम शेटे, सोमनाथ पवार, बाळासाहेब पवार, महेश पवार, नितीन सोनवणे, उपस्थित होते रक्तदानाला विशेष सहकार्य म्हाळुंगे पोलिस चौकीचे पोलिस अधिकारी मुलाणी व संपत मुळे साहेब आणि पोलिस पाटील राहुल साकोरे यांचे लाभले. मोरया ब्लड बँक चे डाॅ निलेश गायकवाड सर व सर्व कर्मचारी यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्या बद्दल त्यांचेही आभार यावेळी मानण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. संतोष शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन हे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आलेले होते.

Previous articleसरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले- एस.एम.देशमुख
Next articleद्वारका वृद्धाश्रमातील वृद्धांचे लसीकरण