पुणे ग्रामीण दलातील पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांना महासंचालक पदक जाहीर

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे ग्रामीण पोलीस दलातील नुकतेच पोलीस उपनिरीक्षकपदी नेमणूक झालेले उमाकांत गोपीनाथ कुंजीर नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना आज रोजी पंधरा वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा व उत्कृष्ठ सेवाभिलेखसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकडून देण्यात येणारे उत्कृष्ठ सेवेकरिता पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे.

उमाकांत कुंजीर यांचे माध्यमिक शिक्षण पुरंदर तालुक्यातील वाघापूर गावात झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण पुरंदर कॉलेज सासवड याठिकाणी झाले आणि पदवी शिक्षण वाघिरे कॉलेज सासवड याठिकाणी झाले.

सन २०१७ साली महाराष्ट्र लोकसेवा मर्यादित विभागीय परीक्षेत उमाकांत कुंजीर यांना यश आले आणि त्यातूनच दिनांक १० फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली.

वडिल कैलासवासी गोपीनाथ रामभाऊ कुंजीर यांचे निधनानंतर मला माझे चुलते चांगदेव रामभाऊ कुंजीर व अशोक रामभाऊ कुंजीर यांनी मार्गदर्शन केल्यामुळेच मी यशस्वी झालो असल्याचे उमाकांत कुंजीर यांनी सांगितले. जिद्द – चिकाटी – आत्मविश्वास हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. धेय्य साध्य करण्याकरिता जीवनात खूप आढथळे येतील पण यातून मार्ग नक्कीच निघतो आजच्या तरुणपिढीनी हे लक्षात घेतले पाहिजे. महासंचालक पदक उमाकांत कुंजीर यांना मिळाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छाचा वर्षाव झाला.

Previous articleशैलेश मोहिते राष्ट्रवादीतून निलंबित
Next articleकोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या समस्या संदर्भात एस.एम.देशमुख यांचे आत्मक्लेश आंदोलन