शैलेश मोहिते राष्ट्रवादीतून निलंबित

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने हनी ट्रॅपचे षडयंत्र रचल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी लेखी पत्राद्वारे दिली.

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्याचे नेतृत्त्व करत आहेत. तीन वेळा विधान सभेचे आमदार म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करून खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे व इतर काही मंडळी सातत्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती

Previous articleरेमडेसिवीर इंजेक्शचा काळाबाजार करणाऱ्या उद्योजकाला नारायणगाव पोलीसांनी ठोकल्या बेड्या
Next articleपुणे ग्रामीण दलातील पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांना महासंचालक पदक जाहीर