अपूर्वा गोसावी हिने जिंकली महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन स्पर्धा

अमोल भोसले,उरुळी कांचन

“महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन (एमएच २)” ही स्पर्धा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंग सायन्स आणि रिसर्च विभागाची विद्यार्थिनी अपूर्वा गोसावी हिने जिंकली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने “महाराष्ट्र हेल्थ हॅकाथॉन (एमएच २)” ही स्पर्धा २३ ते २५ एप्रिल या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होती. आरोग्य खात्यात येणाऱ्या मुख्य आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अभिनव उपाय सुचविणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत हायपोथर्मियापासून अर्भकांना वाचविण्याच्या उद्देशाने नवजात जन्माच्या डिव्हाइसच्या नवकल्पना या प्रस्तावासाठी ”हॅकेथॉनच्या ट्रॅक डी मेडिकल डिवाइसेस” या प्रकारात हा पुरस्कार अपूर्व गोसावी हिने जिंकला आहे. याव्यतिरिक्त अपूर्वा हिने संघाचा लोगो आणि विषय सादरीकरणाची रचनाही या स्पर्धेत केलेली होती. या संशोधनासाठी मला माझ्या विभागाच्या प्रमुख डॉ. रेनू व्यास आणि माझ्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

दरम्यान, दुसरीकडे याच विद्यापीठाची विद्यार्थिनी अणू ओसवालने हिनेही कोपनहेगन बायोइन्फॉर्मेटिक्स हॅकाथॉन 2021 या ऑनलाईन स्पर्धेत मेंटरचा निवड पुरस्कार तसेच पीपल चॉईस पुरस्कारही जिंकला. आयआयटी दिल्लीच्या दोन टीम सदस्यांसह तिने सीएनएनचा आणि आरएनएन वापर करून एक सखोल शिक्षण मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलचा वापर टी सेल्सच्या संभाव्य लक्षणाचे भाकित करून लसी विकास आणि कर्करोग प्रतिरोधक क्षमतेच्या क्षेत्रासाठी केला जाणार आहे.

“आरोग्य आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या आणि परवडण्याजोगे आरोग्यसेवेचे एकात्मिक ध्येय मिळविण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वांनी काम केले आहे. एकंदरीत माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव होता. आम्ही तयार केलेले डिवाइस आरोग्य सेवेसाठी महत्वाचे ठरणार असल्याची माहिती अपूर्वा गोसावी हिने दिली.

Previous articleपाण्याची मोटर चालू करताना विजेच्या धक्क्यामुळे विहरीत कोसळून एकाचा मृत्यू
Next articleरेमडेसिवीर इंजेक्शचा काळाबाजार करणाऱ्या उद्योजकाला नारायणगाव पोलीसांनी ठोकल्या बेड्या