शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८५७२.३४ लक्ष रुपये निधी मंजूर – खा.डॉ.अमोल कोल्हे

अमोल भोसले,पुणे

खेड तालुक्यातील निमगाव श्री खंडोबा देवस्थान मंदिर येथे सर्व सुविधांसह रोप वे व रिंगरोड तयार करण्यासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील एकूण रुपये ८५७२.३४ लक्ष रकमेच्या रस्ते व पुलांच्या कामांना केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर निधीतून पुणे जिल्ह्यातील कामांसाठी रु.१२४७६.६७ लक्ष रकमेची कामे मंजूर केली. त्यापैकी जवळपास रु. ८५७२.३४ लक्ष रकमेची कामे एकट्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील आहेत. केंद्र सरकारने शिरुर मतदारसंघातील कामांना प्राधान्याने मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे आभार व्यक्त करताना म्हणाले की, खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे सर्व सुविधांसह रोप वे बांधण्यासाठी केलेल्या रु. ३१८१.३५ इतक्या निधीच्या तरतुदींमुळे भाविकांची चांगली सोय होणार असून त्यातून पर्यटनाला चालना मिळून रोजगार वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली या सर्वच तालुक्यांना निधी मिळाला असून या मंजूर कामांमध्ये घोडेगाव नारोडी वडगाव काशिंबेग साकोरे कळंब रस्ता (प्रतिमा १३) कि.मी.९/३५० वडगाव काशिंबेग येथे घोडनदीवर मोठा पूल बांधणे (रु.७२१.७८ लक्ष), उरण-पनवेल- भीमाशंकर-वाडा-खेड-पाबळ-शिरुर रस्ता (राज्य मार्ग १०३) कि.मी. २०२/०० ते २१०/०० व कि.मी. २२३/०० ते २२५/०० रस्ता सुधारणा करणे (वाडा ते राजगुरुनगर) ता. खेड (रु. ३९१.४८ लक्ष), कारेगाव करडे निमोणे रस्ता (प्रजिमा ११४) कि.मी. १४/२०० ते १९/८०० रस्ता सुधारणा करणे, ता. शिरूर (रु.३९७.२७), ओतूर ब्राह्मणवाडा रस्ता रुंदीकरण व सुधारणा करणे (प्रजिमा १४९) कि.मी. ००/०० ते १०/५००, ता. जुन्नर (रु. ३९०.०० लक्ष), हडपसर मांजरी वाघोली रस्ता काँक्रिटीकरण करणे (प्रजिमा ५६) कि.मी. ७/०० ते १०/५००, ता. हवेली (रु. ३८५.३९ लक्ष), केशवनगर लोणकर पडळ, मुंढवा (प्रजिमा ३४) कि.मी.००/०० ते २/५०० रस्ता सुधारणा करणे, ता. हवेली (रु.२२०.०७ लक्ष), वाडा (ता. खेड) घोडा (ता. आंबेगाव) प्रजिमा १२ कि.मी. ००/०० ते ९/०० रस्ता सुधारणा करणे, ता. आंबेगाव (रु.२७२.२० लक्ष), डेहणे नायफड (ता. खेड) पोखरी (ता. आंबेगाव) प्रजिमा ३१ कि.मी. ००/०० ते ५/५०० रस्ता सुधारणा करणे, ता. आंबेगाव (रु. १९६.८० लक्ष), राज्यमार्ग १०३ ते खंडोबामाळ निमगाव रस्ता (ग्रामा ६६) कि.मी.००/०० ते ४/८०० व निमगाव रावडी (प्रजिमा १९) कि.मी.६/०० ते ९/३०० आणि दावडी धामणटेक ते राज्य मार्ग १०३ (प्रजिमा ६९) कि.मी.६/५०० ते ११/००, ता. खेड (रु.२४२०.०० लक्ष आणि निमगाव खंडोबा येथे सर्व सुविधांसह एरियल रोप वे उभारणे, ता. खेड (रु.३१८१.३५ लक्ष) या कामांचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात पर्यटन वाढीसाठी आणि भक्ती शक्ती कॉरिडॉरसाठी पायाभूत सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने केलेले प्रयत्न केले. यासोबत सर्व आमदार, स्थानिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडून निधी आणता आला. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे, अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

निमगावचे सुपुत्र व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री. संकेत भोंडवे हे सध्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे. त्यांचेही मनापासून आभार मानतो, असे गौरवोद्गार खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.

Previous articleवर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे सामाजिक जबाबदारीतुन राज्यात एकाच दिवशी झाले ३५ ठिकाणी रक्तदान शिबिर
Next articleसरपंच संतोष कांचन यांनी वार्ड क्रं ६ मधील तातडीने समस्या मार्गी लावली