सरपंच संतोष कांचन यांनी वार्ड क्रं ६ मधील तातडीने समस्या मार्गी लावली

अमोल भोसले,उरुळी कांचन

बऱ्याच दिवसांपूर्वी वॉर्ड क्र. ६ मधील खेडेकर मळा येथे पुणे सोलापूर महामार्गावर एका ट्रकचा अपघात झाल्यामुळे तेथील डिव्हायडरवर असलेला ब्लिंकरचा खांब पडला. गेले कित्येक दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष होत होते. परंतु खेडेकर मळ्यामधे जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे आणि नागरिकांची मोठी वस्ती असल्यामुळे त्या डिव्हायडर मधून वाहनांची ये-जा व शाळा असल्याकारणाने पालकांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन रस्ता क्रॉस करावा लागत असे.
परंतु सध्या रस्त्यावर ब्लिंकर नसल्यामुळे हायवे वरील वाहनांना सावध होऊन वाहन सावकाश चालवण्याचा संदेश मिळत नाही आणि यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता वाढते. नागरिकांची गैरसोय आणि वाढलेल्या अपघाताचा धोका लक्षात घेता वॉर्ड क्र. ६ च्या ग्रामपंचायत सदस्या प्रियांका ओंकार कांचन पाटील यांनी उरुळी कांचन गावचे विद्यमान सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांच्याकडे त्वरित ब्लिंकरची मागणी केली.

या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन सरपंचांनी ताबडतोप साधारण ₹ 30000 किमतीचे 2 ब्लिंकर टाकण्याची परवानगी दिली आणि तात्काळ नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला. या वेळी कामाची पाहणी करताना उरुळी कांचन गावच्या उपसरपंच संचिता संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, सुजाता चंद्रकांत खलसे व अलंकार बाळासाहेब कांचन पाटील उपस्थित होते

Previous articleशिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ८५७२.३४ लक्ष रुपये निधी मंजूर – खा.डॉ.अमोल कोल्हे
Next articleसिद्धेगव्हाणमध्ये लसीकरणास चांगला प्रतिसाद