पारगाव येथे कपड्याच्या दुकानात चोरी ; ४० हजार रुपयांची कपडे चोरीला

प्रमोद दांगट

पारगाव ( शिंगवे ) ता.आंबेगाव येथे असलेल्या ब्रँड हब या कपड्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून दुकानातील ४० हजार रुपये किमतीची कपडे चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद दुकान मालक युवराज बाळशीराम हुले ( रा.काठापुर ता.आंबेगाव ,पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी युवराज हुले यांचे पारगाव येथे ब्रँड हब नावाचे कपड्याचे दुकान असून ( दि.६) रोजी सायंकाळी सहा वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते.दुसऱ्या दिवशी (दि. ७) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना पारगाव येथील दिगंबर टकले यांनी फोनवर सांगितले की तुझ्या दुकानाचे शटर उचकटलेले दिसत आहे तु लवकर ये त्यानंतर फिर्यादी व त्याचा भाऊ हे दुकानावर गेले असता दुकानाचे शटर उचकटलेले व दरवाजाची काच फुटलेली त्यांना दिसली. त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता दुकानातील कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती व त्यांनी कपडे मालाची तपासणी केली असता दुकानातील २० हजार रुपये किमतीच्या फॅन्सी जीन्स व २० हजार रुपये किमतीचे शर्ट ,टी शर्ट नाईट पॅन्ट ,असा एकूण ४० हजार रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले. याबाबत युवराज हुले यांनी मंचर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleनिधन वार्ता:दौलतराव खैरे यांचे निधन
Next articleकर्तव्यात कसूर केल्याने पारगाव शिंगवे येथील पोलीस पाटलाला केले निलंबित