कांदाचे व गाडी भाड्याचे पैसे घेऊन फरार झालेल्या ट्रक ड्रायव्हरला मंचर पोलिसांनी केले जेरबंद

प्रमोद दांगट

मंचर ( प्रतिनिधी ) येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक अनिल फलके यांच्या कांद्याचे व गाडीभाड्याचे लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीस मंचर पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. फलके यांच्या ड्रायव्हरने मुंबई येथे व्यापाऱ्यांकडे कांदा खाली करायला जाऊन व्यापाऱ्याकडून कांद्याचे पैसे व गाडीचे भाडे असे २,८६,००० रुपये घेऊन पसार झाला असल्याची तक्रार दि.२९ रोजी मंचर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.त्यानुसार मंचर पोलीस तपास करत होते. हा तपास करताना मंचर पोलिसांनी सदर आरोपीस नांदेड येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत फलके (वय ३७ रा. मंचर ता.आंबेगाव ) यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्यांच्याकडे असलेल्या एम.एच. ४३ वाय.५९८० या टेम्पोवर नागेश सोपान गायकवाड ( रा. बोरगाव , ता.लोहा जिल्हा नांदेड ) हा ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शुक्रवार दि.२६ रोजी ड्रायव्हर गायकवाड हा फलके यांच्या टेम्पोत जुन्नर वरून कांदा घेऊन मुंबई विरार येथील अभिषेक ट्रेडर्स या व्यापाऱ्यांकडे खाली करण्यासाठी गेला होता. शनिवार दि. २७ रोजी त्याने माल खाली केल्याचे व व्यापाऱ्यांने गाडी भाडे व कांदा मालाचे २ लाख ८६ हजार रुपये दिल्याचे फोनवर कळवले. त्यावेळी मालकाने मी बाहेर असल्याने व्यापाऱ्यांनी दिलेले पैसे मंचर येथील घरी देण्यासाठी सांगितले होते. मात्र ड्रायव्हर गायकवाड याने ती रक्कम घरी दिली नाही व गाडी मंचर येथे बिल्डिंग च्या बाजूला लावून कुठेतरी निघून गेला असल्याची फिर्याद दि.२९ रोजी मंचर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. सदर आरोपी हा नांदेड परिसरातील असल्याने या गुन्ह्याचा व इतर दुसऱ्या गुन्ह्यात याच जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यात गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित मडके , राजेंद्र हिले , योगेश रोडे ,सुनिता बटवाल, शर्मीला होले, रेश्मा गाडगे , वैशाली बिडकर या पोलिसांचे पथक रवाना झाले . या पथकाने ड्रायव्हर नागेश सोपान गायकवाड याला नांदेड मध्ये जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शुक्रवार दि. २ एप्रिल राजी सकाळी अटक केली. सायंकाळी त्याला घोडेगाव कोर्टात हजर करून पोलिसांनी त्याची चार दिवसाची कस्टडी घेतली. यावेळी चौकशीत आरोपीने सांगितले की, कांदा व्यापाऱ्याने फक्त एक लाख तीस हजार रुपये दिले असून त्यातील 35 हजार रुपये खर्च झाले आहे.मंचर पोलिसांनी एक लाख रुपये जमा करून घेतले आहे. सदर आरोपीस १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहे

Previous articleदिवसभर राज्यात पत्रकारांच्या अनोख्या आंदोलनाचीच चर्चा पत्रकारांच्या ‘मेल पाठवा” आंदोनलनास राज्यात उदंड प्रतिसादः एस.एम.देशमुखांनी मानले आभार
Next articleदिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट