दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट

प्रमोद दांगट

अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होत्या . मंत्री वळसे-पाटील गृह गृहमंत्री पदावर विराजमान होणार अशा आशयाच्या बातम्या अनेक न्यूज चॅनेल ,न्यूज पोर्टल यांनी दिल्या आहेत.

या विषयी महाराष्ट्र टाइम्स या पोर्टलवर दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री ? ; पवारांचे स्वीय सहाय्यक या आशयाची सविस्तर बातमी दिली होती . ही बातमी प्रसारित होताच या बातमीच्या खाली किशोर उदास ( पूर्ण नाव माहीत नाही ) या नावाचे अकाऊंट असलेल्या व्यक्तीने दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल अतिशय खालच्या शब्दात बदनामीकारक पोस्ट करत चुकीचे व्यक्तव्य केले आहे. सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्योजक अजय घुले व मंचर चे उपसरपंच युवराज प्रल्हाद बाणखेले यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना दिले आहे.

Previous articleकांदाचे व गाडी भाड्याचे पैसे घेऊन फरार झालेल्या ट्रक ड्रायव्हरला मंचर पोलिसांनी केले जेरबंद
Next articleपिंपरी’बु”मध्ये पहिल्याच दिवशी ३४७ नागरिकांचे लसीकरण