बकोरीच्या डोंगरावर निसर्गप्रेमी तरुणांनी पशु-पक्षांसाठी पाण्याची केली व्यवस्था

गणेश सातव ,वाघोली

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून पूर्व हवेलीतील बकोरी गावच्या डोंगरावर पक्षांना,पाणी पिण्यासाठी झाडाखाली पाण्याचे टप ठेवण्यात आले.सदर टप दर आठवड्याला भरण्याची जबाबदारी दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानचे धनराज वारघडे यांनी घेतली असून हे पाण्याचे टप शिवसमर्थ प्रतिष्ठान वाघोली यांचे माध्यमातून देण्यात आले आहेत.


यावेळी परिसरातील कचराही साफ करण्यात आला .सदर कार्यक्रमासाठी शिवसमर्थ प्रतिष्ठानचे गणेश जाधव,प्रकाश नागरवाड,चैतन्य पवार माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,धनराज वारघडे, पोलीस काँस्टेबल विकास बांगर हे उपस्थित होते.

ऊन्हाळा सुरु झाला असून नागरीकांनी आप आपल्या घरासमोर,परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी केले .

Previous articleकोरेगाव भीमा ते वढु बु. रस्त्याच्या कामाला साडेसहा कोटींची प्रशासकीय मंजुरी
Next articleवाघोलीतील कचरा वाडेबोल्हाईच्या वेशीवर