मातोश्रीच्या हस्ते उद्घाटन  करुन समाज्यात दिला अनोखा संदेश

हवेली -सध्या कोणताही व्यवसाय सुरु करायचा असला की लोक त्याच उदघाटन राजकीय व्यक्ती किंवा चित्रपट कलाकार यांच्या हस्ते करतात.तर लाखो रुपये खर्चुन गर्दी जमविण्यासाठी तसेच व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एखाद्या “सेलिब्रिटी” ला आणतात. परंतु रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील बापूसाहेब शिंदे आणि किरण शिंदे या दोघा भावांनी वाघोली (ता.हवेली) येथील आपल्या नवीन हॉटेलच उदघाटन स्वतःच्या मातोश्री कौशल्या कांतीलाल शिंदे यांच्या हस्ते करुन समाज्यात एक वेगळा संदेश दिला. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” अशी एक म्हण प्रचलित आहे. आपल्या आजुबाजुला आपण अश्या अनेक कर्तृत्ववान व्यक्ती पाहतो ज्यांचं वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. तरीपण त्यांच्या “आई” न त्यांना जिद्दीने वाढवलं, मोठं केल आणि एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणुन उभं केलं. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील बापूसाहेब शिंदे हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. तसेच त्यांचे छोटे बंधू किरण शिंदे हे व्यावसायिक आहेत.

 बापूसाहेब शिंदे आणि किरण शिंदे हे लहान असतानाच त्यांचे वडील कांतीलाल शिंदे यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आई कौशल्या शिंदे यांनी या दोघा भावांना लहानाच मोठं केलं, शिक्षण दिल. तसेच स्वतःच्या पायावर उभं केल. त्यानंतर बापूसाहेब शिंदे राजकारणात तर किरण शिंदे व्यवसायात आले. सध्या बापूसाहेब शिंदे हे शिवसेनेच्या युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी ठरवलं असत तर शिवसेनेच्या कोणत्याही मोठ्या मंत्र्यांना हॉटेलच्या उदघाटनाला निमंत्रित केलं असत.पण लहानपणी वडिलांचं छत्र डोक्यावर नसताना आईन अपार कष्ट करुन मोठ्ठ केलं. त्यामुळं मी आणि माझा भाऊ आज जो काही आहे ते माझ्या आईमुळेच तिच्या ऋणातून आम्ही कधीच उतराई होऊ शकत नाही. म्हणुन आईच्या हस्ते  या नवीन हॉटेलच उदघाटन केल्याचं बापूसाहेब शिंदे यांनी  सांगितलं.

Previous articleघोडेगाव परीसरामध्ये शिवभक्तांनी शिवजयंती साधेपणाने केली साजरी
Next articleडोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात  शिवजयंती  साजरी