हवेली महसूल विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर

Ad 1

गणेश सातव, वाघोली

हवेली तहसीलदार कार्यालयाच्या रेकॉर्ड रुममधील महिला कर्मचारी भोसले यांनी एका नागरिकाकडे महसूल कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी १ गुंठा जमीन व २० हजार रुपयांची लाच मागीतली होती.

यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.लाचलुचपत विभागाचे सदर तक्रारीची शहानिशा करुन आज सकाळी २० हजारांची लाच घेताना भोसले यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.सदर घटनेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम लाचलुचपत विभागाच्यावतीने सुरु आहे