उरुळी कांचन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आबासाहेब टिळेकर तर व्हाईस चेअरमनपदी दिगंबर चव्हाण यांची बिनविरोध निवड

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन  विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या आबासाहेब कृष्णा टिळेकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी दिगंबर चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.डी माळवदकर यांनी काम पाहिले. माजी चेअरमन अरुण भाऊसाहेब कांचन व व्हाईस चेअरमन भीमराव बोलू बडेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचन गावचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, ग्रामपंचायत सदस्य आमित कांचन, राजेंद्र कांचन , मयूर कांचन, व्यापारी आसोसिऐसनचे शहर अध्यक्ष संजय आबासो कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, युवराज कांचन, युवा नेते अलंकार कांचन, माजी सरपंच संतोष टिळेकर, टिळेकरवाडीचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर, सोसायटीचे सचिव संतोष चौधरी, सोसायटीचे चेअरमन माणिकराव टिळेकर, भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर, रोहित मुरकुटे उरुळी कांचन व टिळेकरवाडी येथील अनेक मान्यवर व सोसायटीचे सभासद बांधव उपस्थित होते.