कोरोना विषाणू संक्रमण काळात वैद्यकीय कर्मचा-यांनी चांगले काम केले — डॉ. रवींद्र भोळे

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना विषाणू संक्रमण काळात वैद्यकीय कर्मचा-यांनी चांगले काम केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यात ब-यापैकी यशस्वी झालो तरी अजून पूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही मत जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उरुळी कांचन (ता.हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा कांचन, स्वप्निशा कांचन, आशा वर्कस, रुग्ण कमिटीचे सदस्य, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदीच्या उपस्थितीत बालकांना पोलिओची लस पाजून शुभारंभ केला. पूर्व हवेली मधील कोरेगावमुळ, सोरतापवाडी, शिंदवणे, आष्टापूरल, हिंगणगाव, पेठ, नायगाव, तरडे, वळती, भवरापूर, टिळेकरवाडी – खामगावटेक, न्हावी सांडस, शिंदेवाडी – जगताप वाडी या गावात पाच वर्षाखालील बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या मोहिमेचा शुभारंभ नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख मान्यवरांनी आप आपल्या परिसरात वार्ड मध्ये केला. कोणीही लहान मुले पल्स पोलिओ लसीकरण पासून वंचित राहू नये यासाठी विशेष दखल घेतली.