शिरूर – तरूणावर गोळीबार करणारे एन.जे.साम्राज्य टोळीचे सदस्य पोलिसांच्या जाळ्यात

Ad 1

पुणे – शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात संबंधित तरुण थोडक्यात बचावला असून घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले होते.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,(दि.२६) रोजी सायंकाळच्या सुमारास प्रविण गोकुळ गव्हाणे (वय.२४,रा.पाबळ फाटा) हे त्यांच्या बुलेट मोटारसायकल वरुन सी.टी.बोरा कॉलेज रोड वर व्हीजन स्कुल समोरुन जात असताना अव्हेंजर दुचाकी वरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांना मोटारसायकल आडवी मारुन थांबविले. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात कोयता होता.तसेच त्याचवेळी पाठीमागुन तीन व्यक्ती हे दुचाकीवरुन आले.त्यापैकी एकाच्या हातात कोयता,एकाच्या हातात पिस्तुल व तिस-या व्यक्तीच्या हातात तलवार अशी हत्यारे होती या हल्लेखोरांनी फिर्यादी गव्हाणे यांना कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला माञ त्यावेळी फिर्यादी यांनी झालेला हल्ला चुकवत तिथुन दुचाकी सोडुन पळ काढला. त्यातील एकाने हातातील पिस्तुलाने गोळ्या झाडल्या माञ फिर्यादी गव्हाणे यांनी गोळ्या चुकवुन तेथुन पळ काढला.व त्या खुन करण्याचा प्रयत्न केला होता व शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे . सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक.मिलींद मोहीते , उप विभागीय पोलीस अधिकारी . राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक.पद्माकर घनवट यांना सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक . पद्माकर घनवट यांनी स.पो.नि. पृथ्वीराज ताटे , पोसई शिवाजी ननवरे , सहा.फौजदार दत्तात्रय गिरमकर , पोहवा राजु पुणेकर , उमाकांत कुंजीर , जनार्दन शेळके , पोना . राजु मोमीण , अजित भुजबळ , विजय कांचन , गुरू जाधव , मंगेश थिगळे , पो.कॉ. धिरज जाधव , अक्षय नवले , बाळासाहेब खडके , दगडु विरकर , समाधान नाईकनवरे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते .

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय बातमीदाराकडून बातमी काढून सासवड पो.स्टे.चे पो.नि. आण्णासाहेब घोलप स.पो.नि.श्री.राहुल घुगे , पो.कॉ.निलेश जाधव , उगले , डहाणे यांचे मदतीने गुन्हयातील आरोपी गोपाळ उर्फ गोप्या संजय यादव व त्यासोबत असणारे अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले यांना सासवड येथून ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता आरोपी गोपाळ यादव याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याकरीता त्याचे साथिदार नामे २ ) शुभम सतिश पवार रा . पापडेवस्ती , भेकराईनगर , पुणे , ३ ) अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले , रा . भेकराईनगर पुणे , ४ ) शुभम विजय पांचाळ रा . हडपसर , पुणे , ५ ) निशांत भगवान भगत रा . भेकराईनगर फुरसुंगी , पुणे , ६ ) आदित्य औदुंबर डंबरे , रा . ससाणेनगर , हडपसर पुणे , ७ ) शुभम उर्फ बंटी किसन यादव , रा.गोंधळेनगर , हडपसर , पुणे यांना सुपारी दिली असल्याची माहीती दिली त्यानुसार आरोपी अ.नं. २ , ४ ते ७ यांना त्यांचे राहते घरून ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपी अ.नं. २ ते ६ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून व आरोपी क . ७ याने गुन्हा करणेकरीता पिस्टल पुरवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे .

पकडलेल्या आरोपींपैकी अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले हा हडपसर पो.स्टे.कडील खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयात पाहिजे आरोपी आहे तसेच गोपाळ यादव याचेविरूध्द खुनाचा प्रयत्न , शुभम पवार याचेविरूध्द अवैद्य हत्यार बाळगल्याचा , अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले याचेविरूध्द खुन , खुनाचा प्रयत्न , दुखापत करणे , शुभम विजय पांचाळ याचेविरूध्द खुनाचा प्रयत्न , बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे , निशांत भगत याचेविरूध्द दुखापत करणे , बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे , आदित्य औदुंबर डंबरे याचेविरूध्द खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहेत . सदर गुन्हयातील आरोपींनी तसेच एन.के.साम्राज्य ग्रुपचे सदस्यांनी अत्याचार केलेबाबत काही तक्रारी असल्यास नागरीकांनी निर्भयपणे पुढे येवून तक्रार दयावी असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे