आंबेगाव तालुक्यात दर महिन्याला फेरफार अदालत घेण्यात येणार तहसिलदार रमा जोशी

सिताराम काळे, घोडेगाव

आंबेगाव तालुक्याच्या महसुल विभागातील वारस नोंदी, फेरफार दुरूस्ती, बोजा आदि नोंदी लॉकडाऊनमुळे प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तालुक्यात दर महिन्याला फेरफार अदालत घेण्यात येणार असल्याचे प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर व तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव सर्कल विभाग व इतर विभागांमध्ये दि. २० रोजी एकाच दिवशी फेरफार अदालत घेण्यात आली. याप्रसंगी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार अनंता गवारी, लतादेवी वाजे, मंडलाधिकारी योगेश पडाळे, सिताराम पवार, तलाठी दिपक हरण, संजय गायकवाड, दिपक करदुले, विकास खोटे, ए. एन. बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुक्यातील फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडल स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले होते. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तालुक्यातील काही फेरफार अदालतीला उपस्थित होते. फेरफार अदालतीसाठी संबंधित नागरिक संबंधित मंडलाच्या मुख्यालयी उपस्थित राहुन आधिका-यांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपल्या नोंदी करून घेत होते.

लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडलस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी घेण्यात येणार असुन नागरिकांनी आपल्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी नोंदी निर्गत करून घ्याव्यात, असे आवाहन नायब तहसिलदार अनंता गवारी यांनी केले.

Previous articleबैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी नॅशनल अँनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक बोलावण्याची केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
Next articleग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी पाच वर्ष घर सोडून बाहेर राहिला पठ्ठ्या