ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी पाच वर्ष घर सोडून बाहेर राहिला पठ्ठ्या

बाबाजी पवळे,राजगुरूनगर-ग्रामपंचायत निवडणुका कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर जिंकल्याच्या प्रतिक्रिया अनेक विजयी उमेदवारांनी दिल्या आहेत. मात्र कुटुंबाच्या विरोधानंतरही निवडणूक मारणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी समोर आली आहे. साहजिकच हाय टेंशन असलेल्या या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर घरातील व्यक्तींनी स्वागत केले.

 

कुटुंबाच्या विरोधानंतरही निवडणूक मारणाऱ्या पठ्ठ्याचे नाव आहे.खेड तालुक्यातील वाकळवाडी येथील २५ वर्षीय कु.नरेंद्र संभाजी वाळुंज या पठ्ठ्याला लहानपणापासून ग्रामपंचायत निवडणुक लढवायची इच्छा होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी २१ वर्षांचा असताना पदवीधर नरेंद्र वाळूंज यांने उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण कुटूंबातील सदस्यांच्या विरोधामुळे त्याला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागला होता.

त्यावेळी वाळुंज याने निवडणूक जिंकूनच घरी घेईल असा पण केला व घर सोडून पाच वर्ष बाहेर राहिला पण घरी आला नाही. यंदा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आणि घरचे कोणीही सोबत नसताना उमेदवारी अर्ज दाखल केला. कुटूंबातील सदस्य व गावातील तरूण मित्रमंडळींच्या मदतीने विरोधी उमेदवारावर विजय मिळवत बाजी मारली.

सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील, माथाडी कामगार नेते इरफान भाई सय्यद,भाजपाचा तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, संदिपभाऊ सोमवंशी भाजपा जिल्हाध्यक्ष, राजशेठ जवळेकर, पांडुरंग वहिले, राहुलशेठ तांबे, मोईचे सरपंच राहुल गवारे, शैलेश मोहिते यांच्यासह मित्रांनी शुभेच्छा दिल्या

Previous articleआंबेगाव तालुक्यात दर महिन्याला फेरफार अदालत घेण्यात येणार तहसिलदार रमा जोशी
Next article“संग्राम घोडेकर” हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या जामीन अर्जावर २५ जानेवारीला सुनावणी