‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ आयोजित “संवाद तरुणांचा तरुणांसाठी”कार्यक्रमाला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद

अमोल भोसले,उरुळी कांचन

‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ आयोजित ‘संवाद तरुणांचा तरुणांसाठी’ हा कार्यक्रम व्हीकटोरिअस स्कूल, खराडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला तरुणांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. कमांडो श्यामराज यांची संघर्ष कथा ऐकून उपस्थित भारावून गेले तर त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने तरुणांना मोठे प्रोत्साहन मिळाले.

सुरेंद्र पठारे यांनी फाऊंडेशनच्या स्थापनेमागचा विचार आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. श्री. रॉबिन घोष यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले. भैय्यासाहेब जाधव यांनी आपल्या शैलीने उपस्थितांना खिळवून ठेवले.
बापूसाहेब पठारे यांनी फाऊंडेशन च्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. ‘युथ फाऊंडेशन’ चे संस्थापक रोहन शेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान रोजगार नोंदणी अभियानाला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. आज नोंदणी केलेल्या होतकरू युवकांना चांगला रोजगार देण्यासाठी ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ कटिबद्ध आहे. यापुढेही असे कार्यक्रम ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ आयोजित करत राहील आणि युवकांना जोडण्याचे काम असेच अव्याहतपणे सुरू राहील.

Previous articleश्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
Next articleवारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार विजयी:भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय