वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार विजयी:भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय

किरण वाजगे,नारायणगाव

वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये गणपीर बाबा पॅनलचे 10 उमेदवार निवडून आले आहेत. तर भागेश्वर पॅनलच्या सात उमेदवारांचा विजय झाला आहे

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
वाँर्ड क्रमांक एक मध्ये
राजेंद्र तुकाराम मेहेर यांना 451 विजयी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी कुणाल दत्तात्रेय वायकर यांना 325 मते मिळाली आहेत.
राजश्री विशाल काळे यांना विजयी 329 मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी मनीषा सोमनाथ काळे यांना 377 मते मिळाली आहे

महिला सर्वसाधारण मध्ये माया सुजित डोंगरे यांना 391 विजयी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रमिला निलेश पाटे यांना 382 एवढी मध्ये मिळून त्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये माया सुजित डोंगरे या अवघ्या 9 मतांनी विजयी झाल्या आहेत.

वॉर्ड क्रमांक दोनमध्ये
श्याम भाऊ दुधाने यांना 483 विजय मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी रामा मारुती जाधव यांना 317 मते मिळाली आहेत.

सर्वसाधारण गटांमध्ये माजी सरपंच देवेंद्र सुदाम बनकर यांना 478 विजयी मते मिळाली असून राजेंद्र तुकाराम मेहेर यांना 335 मते मिळाली आहेत.

वार्ड क्रमांक दोनमध्ये वैशाली महेश मेहेर यांना 507 विजयी मते मिळाली असून मीना बनकर यांना 306 मते मिळाली आहेत.
वार्ड क्रमांक 3 मध्ये प्रकाश भालेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

शुभांगी शाम कानडे यांना 322 विजयी मते मिळाली असून मीना संतोष वारुळे यांना 293 मते मिळाली आहेत

वार्ड क्रमांक 4 मध्ये
आत्माराम दत्तात्रेय संते यांना 507 एवढी विजयी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी गुंजाळ नितीन यांना 448 मते मिळाली आहेत. याच वाँर्ड मध्ये महिला मध्ये ज्योती साईनाथ संते यांना 587 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुभद्रा बटवाल यांना 372 मते मिळाली आहेत.

किरण महादेव अल्लाट यांना 515 विजयी मते मिळाली असून आदम अब्दुल कादर कुरेशी यांना 432 मते मिळाली आहेत.
क्रमांक पाचमध्ये विपुल अरुण फुलसुंदर 460 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी विनायक सुधीर भुजबळ यांना 540 विजयी मते मिळाली आहेत.

रेखा विकास फुलसुंदर यांना 534 विजयी मते मिळाली असून माजी सरपंच ज्योत्स्ना फूलसुंदर यांना 458 मते मिळाली आहेत.
सोनल संदीप अडसरे यांना 546 विजयी मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी सविता पोपट अडअरे यांना 446 मते मिळाली आहेत.

वाँर्ड क्रमांक सहामध्ये
माजी सरपंच जंगल कोल्हे 442 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी सतेज भुजबळ यांना 226 मिळाले आहे

संगिता दत्तात्रय काळे यांना 656 विजयी मते तर कुंदा भीमदेव काळे यांना 499 मते मिळाली आहेत.

स्नेहल अतुल कांकरिया 754 मते मिळून विजयी झाल्या असून रजनी राजेंद्र गायकर यांना 410 मते मिळाली आहेत.

या निवडणुकीमध्ये गणपीरबाबा ग्रामविकास पॅनलच्या बिनविरोध एका विजयी उमेदवारासह एकूण 10 उमेदवार विजयी होऊन गणपीर बाबा पॅनलने निर्णायक सत्ता मिळवली आहे.

भागेश्वर पॅनलचे माजी सरपंच देवेंद्र बनकर तसेच माजी सरपंच आत्माराम संते यांसह 7 उमेदवार निवडून आले आहेत.

या निवडणुकीमध्ये माजी सरपंच ज्योत्स्ना सुरेश फुलसुंदर यांचा पराभव झाला असून ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे यांच्या सुनबाई प्रमिला पाटे यांचा अवघ्या 9 मतांनी पराभव झाला आहे

Previous article‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ आयोजित “संवाद तरुणांचा तरुणांसाठी”कार्यक्रमाला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद
Next articleदौंडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ