भाजपच्या वतीने गरजू भजनी मंडळांना व रिक्षा चालकांना शिधा वाटप

Ad 1

प्रतिनिधी : अतुल पवळे

मदत नव्हे कर्तव्य असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे मा.आ.जगदीशजी मुळीक ( शहराध्यक्ष )  यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते वारजे परिसरातील भजनी मंडळातील काही गरजवंतांना कोरडा शिधा कीट आणि अतुलनगर रिक्षा स्टॅन्डवरील ३० रिक्षाचालकांना ५ किलो आटा पाकीटे , काॅटनचे वाॅशेबल मास्क , अर्सेनिक अल्बम ३० च्या रोगप्रतिकारक शक्तीवाढीच्या गोळ्या यांचे वाटप करण्यात आले .

लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासुन संपुर्ण पुणे शहरात भारतीय जनता पार्टीचे आमदार , नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे गरजवंताच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत . आज तीन महिन्यानंतरही भाजपा चा कार्यकर्ता कुठेही कमी पडत नाही याचा विशेष आनंद होत असल्याचे शहराध्यक्ष मुळीक यांनी सांगितले .
या प्रसंगी प्रतिकजी देसरडा , संतसेवक कैलासजी देवकर , पै.आप्पा दांगट , संदीप कडु सलीम शाह , आनंता गांडले , अमजद अन्सारी , मुकुंद जाधव , सुरज भालेराव यांचेसह अनेक कार्यकर्त्यांच्या ऊपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत सभासद यांनी केले होते.

जाहिरात