मंचर येथे महिलेचा विनयभंग करत केली मारहाण

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर ( ता.आंबेगाव )येथील एका ३० वर्षीय महिलेला शिविगाळ ,मारहाण आणि विनयभंग केल्याची घटना बुधवार दि.२४ रोजी मंचर गावच्या हद्दीतील क्रीडा संकुल परिसरात दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पिढीत महिलेने आठ जणांविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असुन तिघे फरार आहेत. फरार तीन आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादित महिलेने दिलेल्या जबाबात सांगितले की संबधित महिला व आनंद उर्फ सोन्या सुधीर नाटे , ( वय २१ रा. चोंडेश्वरी गल्ली, मंचर) यांच्यासोबत मी दारु पित होती. त्यावेळी तेथे आनंद नाटे याचे मित्र राम उर्फ बाळे शिवाजी काळे ( वय २९ रा. काळेमळा चांडोली बुद्रुक) ,संतोष उर्फ पप्पु हरिचंद्र शिंदे ( वय २७ रा. शिंदेमळा ,अवसरी खुर्द ) ,विजय उर्फ पप्पु नंदकुमार मोरडे ( वय २२ रा. मोरडेवाडी ) ,सिद्धार्थ उर्फ गोट्या गौतम गायकवाड ( वय २४ रा. चांडोली बुद्रुक ) ,पवन सुधीर थोरात ( रा. मंचर ) , ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले ( रा. बाणखेले मळा, मंचर) ,तुषार नितीन मोरडे ( रा. मोरडेवाडी ) हे सर्व घटनास्थळी आले आणि माझ्या आणि आनंद नाटे यांच्यासोबत दारु पिण्यासाठी बसले. सर्वजण दारु पित असताना आनंद नाटे यांनी माझी ओढणी ओढली.त्यावेळी मी आनंद नाटे यांना ओढणी का ओढलीस असे विचारले असता आनंद नाटे यांनी माझा विनयभंग केला. मी तेथुन निघुन जात असताना सदर आठ जणांनी मला लाकडी काठीने,लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.मी आरडाओरडा केल्याने तेथे भंगार करणारे लोक जमा झाल्याने सदर आठ जणांनी शिविगाळ करत तेथुन निघुन जात असताना याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारुन टाकण्याची धमकी मला दिली.याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात संबधित महिलेने फिर्याद दिली आहे. या सर्व आरोपींपैकी पाच आरोपीना मंचर पोलिसांनी आनंद नाटे, राम काळे, संतोष शिंदे ,विजय मोरडे, सिद्धार्थ गायकवाड यांना अटक केली आहे. तर पवन थोरात, ओंकार बाणखेले, तुषार मोरडे हे आरोपी फरार आहेत. या आरोपींवर कलम ३५४ , १४३, १४७ ,१४९ , ३२४ ,३२३ , ५०४ ,५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान अजित मडके करत आहे.

Previous articleवीजग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलात महावितरणने सुधारणा करावी – खासदार डॉ.अमोल कोल्हे
Next articleवैद्यकीय तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची युवकांना संधी ; इच्छुक युवकांनी राजगुरुनगर मधील पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला संपर्क साधण्याचे आवाहन