सोशल डिस्टंसिंगचे पालन करत क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीचे भाविकांनी घेतले दर्शन

सिताराम काळे घोडेगाव -संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीचे भाविकांनी दर्शन घेतले. मास्क लावून तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

राज्य शासनाने मंदिरे दर्शनासाठी सुरू केल्यानंतर ही पहिलीच संकष्टी चतुर्थी होती. त्यामुळे भाविकांनी सकाळपासून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पहाटे महापूजा त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

सकाळपासून भाविकांना देवस्थानच्या वतीने सूचना करण्यात येत होत्या. मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्याचे पालन भाविकांनी केले .सायंकाळी गर्दीत काहीशी वाढ झाली. त्यावेळीही सोशल डिस्टनचे पालन करत दर्शन घेण्यात आले. मंदिर पायथ्याशी भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती .त्यामुळे वाहनांचे पार्किंग सुलभ झाले.मंदिरा lसमोरील सभामंडपात यावेळी प्रथमच भाविकांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे दर्शन झाल्यानंतर भाविक लगेच माघारी परतत होते. दुपारी तीन वाजता व सायंकाळी सात वाजता आरती संपन्न झाली. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टने व्यवस्था पाहिली.

Previous articleमंचर ग्रामपंचायतीचे होणार नगरपंचायतीत रूपांतर
Next articleतीन बछड्यांसह वाघीण फिरत असल्याची अफवा