तीन बछड्यांसह वाघीण फिरत असल्याची अफवा

राजगुरुनगर-सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे.सोशल मीडिया हे संदेश देवाण घेवाण करण्यासाठी उत्तम माध्यम आहे.परंतु सध्या सोशल मीडियाचा अफवा पसरवण्या साठी वापर होत असल्याची प्रचिती येत आहे, खेड शहर व तालुक्यात सध्या भिमाशंकर परीसरातील डेहणे,वांद्रा,खरपुड, कोहिनकर वाडी, काळेची वाडी, आडगाव परिसरात पट्टेरी वाघीण आपल्या तीन बछड्यां सह फिरत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात खेड तालुक्यात व्हॉटसअप ग्रुप वर फिरत असल्याचे दिसून येत आहे, याचीच चर्चा सध्या पूर्ण तालुक्यात सुरू आहे. आधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीने आशुतोष शेंडगे वनपरिक्षेत्र अधिकारी खेड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले आहे की सदर व्हिडिओ हा कोणतीतरी अफवा पसर विण्याचे उद्देशाने व्हॉटसअप वर शेअर केल्याचे दिसून येत आहे.

सदर वाघीण व बछडे हे विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातील असून त्यांना वास्तव्या करिता या भागातील वातावरण पोषक नाही. कुणीतरी भीती पसरवण्याचे दृष्टीने खोडसाळपणा केलेला आहे, खेड तालुक्याचे काही भागात कमी जास्त प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य आहे. सध्या ऊस पिकाची तोडणी सुरू असल्यामुळे व लपण क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडत आहे, वन विभाग खेड यांनी आवाहन केले आहे की, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बिबट्याचा कुठेही आढळ असल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, तसेच बिबट्याचे ऊस क्षेत्र आश्रय स्थान असल्यामुळे, ऊस तोड कामगारांनी लहान मुले शेती पासून दूर अंतरावर सुरक्षित ठेवावीत, ऊसतोड करताना अत्यंत सावध राहावे वारंवार आवाज करून शेतीमध्ये लहान लहान दगड फेकावेत,शक्य तो समूहाने राहत आवाज करत ऊस तोडणी करावी,बिबट्यांची तसेच रान मांजरीचे लहान पिल्ले आढळ ल्यास त्यांना स्पर्श करू नये.मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी व बिबट्या जन जागृती साठी खेड वन विभागाची पथके तयार करण्यात आली असून सदर पथके गावा गावात जाऊन बिबटया पासून सावधानता कशी बाळगावी याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून भित्तीपत्रके चिटकवून, माहितीपर पत्रकांचे वाटप करत आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका, बिबट्या अस्तित्व बाबत काही माहिती असल्यास तात्काळ वनविभाग शी संपर्क साधावा.

Previous articleसोशल डिस्टंसिंगचे पालन करत क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीचे भाविकांनी घेतले दर्शन
Next articleतलवार बाळगल्याप्रकरणी एकाला अटक