किल्ले धर्मवीरगडावर भव्य दीपोत्सव सोहळा संपन्न

दिनेश पवार,दौंड

दिवाळीच्या पाडव्यांनिमित्त सालाबादप्रमाणे धर्मवीरगड पेडगाव येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे.श्री शिवदुर्ग संवर्धन व टीम धर्मवीरगड यांनी हा सोहळा आयोजित केला होता.छत्रपती संभाजीराजे यांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या पेडगाव किल्यात पाच हजार दिवे प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा केला.फटाक्यांची गगनचुंबी आतिषबाजी करण्यात आली.हे दिपोत्सवाचे आठवे वर्ष आहे.”पहिला दिवा शंभुराजेंच्या चरणी “हे ब्रीद घेऊन हा भव्य सोहळा पार पडला.


श्रीगोंदा,अहमदनगर,दौंड,शिरूर व महाराष्ट्रातुन शंभुभक्त या भव्य दिप उत्सव कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व मावळे दुपारी ३.०० वाजता गडावरील भैरवनाथ मंदिराजवळ जमा झाले.प्रथम मुख्य वेशिपाशी नारळ वाढवून भैरवनाथ मंदिरात ज्योत प्रज्वलित केली.

छत्रपती शंभुराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मारक परिसराची स्वच्छता केली.मावळ्यांनी संभाजीराजे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन दीपोत्सवाला सुरवात केली.छत्रपती संभाजीराजे स्मारक परिसर ,टेहळणी बुरुंज व झिग झाघ पायऱ्या व वेस परिसरात भव्य दीप प्रकाशमान केल्या.शौर्यस्थळ परिसरात भव्य दीपप्रज्वलन करत परिसर प्रकाशमान केला होता.टेहळणी टेकडीवरती (zigzag) पायऱ्यावरती दीपप्रज्वलन केले.किल्ल्यातील यादवकालीन रामेश्वर मंदिर ,मल्लिकार्जुन मंदिर ,पाताळेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर व बालेश्वर मंदिरात दीपज्योत प्रज्वलित केल्या होत्या.सर्व परिसर प्रकाशमान करण्यात आला.

यावेळी गडपाल भाऊ घोडके व नंदकिशोर क्षीरसागर याना दिवाळी फराळ व मिठाई भेट देण्यात आले.यावेळी प्रा.राजेश बाराते यांनी सर्व मावळ्यांना मार्गदर्शन करत ऐतिहासिक वारशाची माहिती दिली.पेडगाव किल्याचा इतिहास उजागर करत भोसले कुळाची माहिती दिली.

बाबाजीराजे,मालिजीराजे,परसोजीराजे,शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेडगाव परिसर महत्व प्रतिपादित केले.छत्रपती शंभुराजेच्या अनंत यातनांचा साक्षीदार असलेल्या प्रसंगाची माहिती दिली व श्री शिवदुर्ग संवर्धनच्या संवर्धन कार्याची थोडक्यात माहिती दिली.अनेक शिवप्रेमीनी मनोगते व्यक्त केले,आभार डॉ.निलेश खेडकर यांनी मांडले.सरतेशेवटी शिववंदना घेत या भव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या भव्य कार्यक्रमासाठी डॉ.निलेश खेडकर,दादासाहेब जंगले,प्रतीक पाचपुते,कालिदास कोथिंबीरे,विनायक डाळिंबकर, किरण कवडे,प्रा राजेश बाराते, रोहित कणसे, शिवाजी नवले, रोहित मोहिते, सिद्धांत खेडकर, तेजस खेडकर, शिवाजी काळे, मधुकर जगताप तसेच टीम धर्मवीरगड मधील जंगलेवाडी, कोळगाव, श्रीगोंदा, मांडवगण,देऊळगावराजे,वडगावदरेकर,मुंढेकरवाडी,आनंदवाडी,इनामगाव,गणेगाव,दौंड,पेडगाव,निमगावखलू,पवारवाडी,बेलबंडी,अजनूज,कौठा,काष्टी,श्रीगोंदा फॅक्टरी, मढेवडगाव,लबडेवस्ती,गणेशा,वांगदरी,पेडगाव धाकटे, शिवाजीनगर, कुळधरण,स्वामी चिंचोली,तांदळी,भांबोरा या विभागातील शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महत्वाची भूमिका पार पाडली.

Previous articleदौंड मध्ये गोरगरीब जनतेला फराळ वाटप
Next articleमहसूल विरोधातील ग्राहक पंचायतीच्या साखळी आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा