दौंड मध्ये गोरगरीब जनतेला फराळ वाटप

दिनेश पवार,दौंड

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) दौंड शहर व तालुका वतीने मतिमंद व गरीब मुलांना दिपावली फराळ वाटप करण्यात आले.सध्या कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने सगळेच आर्थिक अडचणी मध्ये आहेत त्यामुळे आलेला हा दिवाळी सण सर्वांनी च साध्या पद्धतीने साजरा केला आहे तर सर्वसामान्य कुटुंबात दिवाळी झाली पण नाही अशा लोकांना दिवाळी फराळ चे वाटप या सामाजिक संस्थेने केले आहे,गरीब व मतिमंद मुलांना व त्यांच्या कुटुंबियांना दिपावलीचा फराळ (चिवडा, चकली, बेसन लाडू, शंकरपाळी, सोनपापडी, बदाम हलवा, बालूशाही, पायनापल बर्फी आणि पिस्ता बर्फी, ) वाटप करण्यात आला.

यावेळी DBN ग्रुप व रिपाइं A चे अध्यक्ष आयु सचिन भाऊ खरात व सम्राट अशोक मौर्य स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ गायकवाड, नगरसेवक रमेश तांबे ,संघटनेचे व पक्षाचे प्रवीण धर्माधिकारी, शशांक गायकवाड, विजय शिंदे, अभय भोसले,बाबा कोरे,अमोल नेटवटे, राम देवडे,अरबाज शेख, विनय सोनवणे,प्रशांत मदने, मंगेश साठे,आकाश गायकवाड या सर्वांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले व संस्थेचे शिक्षक संजय बनसोडे व दिगंबर पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे व संघटनेचे व पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
Next articleकिल्ले धर्मवीरगडावर भव्य दीपोत्सव सोहळा संपन्न