पुणे पदवीधर मतदारसंघातून ‘भाजपा’चा अधिकृत उमेदवार बहुमताने निवडुन आणा- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

Ad 1

गणेश सातव, वाघोली, पुणे

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आज वाघोली(ता.हवेली)येथील हॉटेल शांग्रीला येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. १ डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पक्षाने उमेदवारी दिलेले अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,शिरुर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे,जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,जालिंदर कामठे,सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे,माजी तालुका अध्यक्ष रोहिदास उंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव,संदीप भोंडवे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, तालुका अध्यक्ष सुनील कांचन पाटील,पंचायत समिती सदस्य शाम गावडे,प्रवीण काळभोर,गणेश कुटे,राहुल शेवाळे,अमोल शिवले,शरद आव्हाळे,स्वप्निल उंद्रे,महिला आघाडीच्या पूनम चौधरी आदी पक्षाचे प्रतिनिधी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीचे नियोजन पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप सातव,हवेली तालुका युवा मोर्चाचे अनिल सातव यांनी केले होते.

“पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या सर्व मंडलामधील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदार नोंदणी केली असून,पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांना जिल्ह्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार आहोत.यासाठी तळागाळातील सर्वचं कार्यकर्ते सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत-” संदिप सातव – संघटन सरचिटणीस,भा.ज.पा. युवा मोर्चा