ऐतिहासिक शिरकोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोमल माने यांची बिनविरोध निवड

Ad 1

वेल्हे -शिरकोली (ता.वेल्हे ) ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील बोरगे यांनी ठरल्यानुसार राजीनामा देण्यास नकार दिल्याने सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला. त्याप्रमाणे तहसीलदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष सभेत 5- 0 ने त्यांच्या विरोधात ठराव एकमताने मंजूर झालेनंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाचे पोटनिवडणुकीसाठी विद्यमान सरपंच सुनीता पांडुरंग पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली (दि.11)रोजी घेण्यात आलेल्या सभेत उपसरपंच पदासाठी कोमल अमृत माने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अंकुश पोळेकर ,ग्रामपंचायत सदस्य मारुती मरगळे ,ग्रामपंचायत सदस्या शोभा बोरगे ,ग्रामपंचायत सदस्या सिंधू पेढीकर ग्रामसेवक विट्टल घाडगे युवा नेते विराज पासलकर, भाजपा युवा मोर्चा वेल्हे तालुका कार्याध्यक्ष सुनील चंद्रकांत बोरगे, अमृत माने ,युवा नेते अशोक मरगळे व ग्रामस्थ उपिस्थत होते. तसेच सर्व गावकऱ्यांनी उपसरपंच सौ.माने यांचा निवडीबद्दल सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.