अवसरी बुद्रुक येथे उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून २४ वर्षीय तरूणाचा दुर्देवी मृत्यू

Ad 1

बाबाजी पवळे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शिरूर रस्त्यावर अवसरी बुद्रुक एसटी स्टँड समोर झालेल्या अपघातात अरुण आफुल भोसले (वय 24, रा.अवसरी बुद्रुक, ता.आंबेगाव जि.पुणे) ज्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली .या बाबत भोसले यांचा भाऊ कैलास भोसले यांनी ट्रॅक्टर चालका विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार,अरुण भोसले आपल्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक (MH 14 AV 8046) रस्त्याने चालला होता त्याचा कोणत्यातरी वाहनाला धक्का लागून तो खाली पडल्याने समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या (MH14 BY6554) मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खबाले, पोलीस नाईक गणेश डावखर, पोलीस हवालदार विठ्ठल वाघ, सुदर्शन माताडे आदींनी येऊन झालेल्या घटनेची माहिती घेऊन पंचनामा करून अरुण भोसले याचे शव शवविच्छेदनासाठी घोडेगाव येथे पाठवले आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश डावखर करत आहे.