श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

बाबाजी पवळे, राजगुरूनगर -शासनाच्या आदेशानुसार दिवाळीच्या पाडव्याचे औचित्य साधुन श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी पहाटेची पुजा करून मंदिर सकाळी ५.३० वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता मंदिर बंद करण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष अँड. सुरेश कौदरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर नागरीकांनी आपली काळजी घ्यावी. मंदिराच्या गाभा-यापर्यंत नागरीकांना दर्शन दिले जात आहे. एसटीस्टॅंड जवळ येणा-या भाविकांना सॅनिटायझर, टेंपरेचर, ऑक्सीजन तपासले जात असुन नंतर त्यास मंदिराकडे दर्शनासाठी पाठविले जात आहे. शासन नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.

शासन नियमाप्रमाणे नागरिकांची तपासणी करत असताना काही भाविकांना राग येत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व शासनाच्या नियमाप्रमाणे हे करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी नागरिकांनी आपल्यापासुन इतरांना त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी, असे आवाहन भिमाशंकर देवस्थान अध्यक्ष अँड. सुरेश कौदरे यांनी केले आहे.

Previous articleअवसरी बुद्रुक येथे उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून २४ वर्षीय तरूणाचा दुर्देवी मृत्यू
Next articleभिमाशंकर परीसरामध्ये पोलिस बंदोबस्त तैनात