गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी-दिलीप वाल्हेकर

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन — प्रतिनिधी

भाजपनं गोपीचंद पडळकर यांना आमदार का केले याचं उत्तर आज राज्याला समजले. परंतु भाजपच्या दारात गळ्यात पट्टा घालून साखळी घातलेल्या भूकणाऱ्याला महाराष्ट्र दाद देणार नाही. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात फिरु देणार नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते शरद पवार यांच्या विषयी केलेल्या विधाना बद्दल जाहीर निषेध नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना निवेदन देण्यात आले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते शरद पवार यांच्या विषयी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करतो त्यांनी यापुढे आपली योग्यता – आपली क्षमता पाहून बोलावे असे शिंदवणे गावचे सरपंच आण्णासाहेब महाडिक यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी, हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती सनि काळभोर, चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय तुपे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, जेष्ठ नागरिक सेलचे रा.कॉ.पुणे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, सोरतापवाडी ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र चौधरी, आप्पासाहेब काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, युवा नेते सागर कांचन विद्यार्थी तालुका अध्यक्ष सनि चौधरी, सांस्कृतिक तालुका अध्यक्ष विशाल भोसले, स्मिता नॉर्टन, रामभाऊ तुपे, ऋषीकेश काळभोर, संजय चौधरी आदि उपस्थित होते.