दिपावलीच्या सणा निमित्ताने गर्दी होणार याबाबत काळजी घ्यावी-सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

गेली सात महिने झाले आपण सर्व जण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढत असल्याने जसे गणेशोत्सव व नवरात्र व रमजान ईद या पवित्र सणाच्या दिवशी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तसेच येणाऱ्या दिपावलीच्या काळात नागरिकांनी व व्यापारी वर्गाने – ग्राहकाने सहकार्य करावे असे आवाहन उरुळी कांचन (ता.हवेली) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी केले.

प्रामुख्याने गर्दी होणार नाही याची काळजी सर्वानीच घ्यावी कारण जीवघेण्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांना आज मानसिक आधार देण्याची गरज आहे, प्रत्येकाच्या मनात आज कोरोना आजाराविषयी एक भयंकर भिती गेल्या सात महिन्यांपासून बिंबवली गेली याच कारणास्तव अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

माणूस निश्चितच वाचला पाहिजे हीच गोष्ट मनी धरुन गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना आजाराविषयी राज्य सरकार, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, आशा वर्कर्स, पोलिस विभाग, पत्रकार , ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचारी आपल्यासाठी आहोरात्र झटत आहे यांची जाणीव ठेवूनच सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

Previous articleआळंदीतील महाराष्ट्र सैनिकांचे राजसाहेबांकडून कौतुक
Next articleनारायणगाव उपबाजार समितीच्या आवारात दोन गटांत लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी तुफान हाणामारी