आळंदीतील महाराष्ट्र सैनिकांचे राजसाहेबांकडून कौतुक

आळंदी- आळंदीत राहून तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करत आहात तुम्ही आळंदीतील समस्या बाबतीत लढत रहा मी तुमच्या सोबत आहे अशी आपुलकीची व मायेची थाप राजसाहेब ठाकरे यांनी आळंदीतील महाराष्ट्र सैनिकांना दिली

आळंदीतील मनसैनिकांनी राजसाहेब यांची भेट घेऊन लाखोंच्या संख्येने वारकरी व भाविक भक्त आषाढी व कार्तिकी यात्रेला माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी शहरामध्ये येतात शहरामध्ये दर्शनबारीची सोय नाही स्वच्छ पिण्याच्या पाणी पुरवठ्याची सोय नाही व मागील महाराष्ट्र सरकारने होते ते दर्शनबारी,अग्निशामक आरक्षण उठविल्या बाबत शहरातील पाणी पुरवठा व विविध समस्या बाबतीत मंगळवारी राजसाहेब ठाकरे यांच्या पुढे मांडले या सर्व समस्या बाबतीत लवकरच मी महाराष्ट्र सरकार सोबत बोलतो असे साहेबांनी सांगितले व लवकरच मी आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी येईल असे सांगितले आळंदीत लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक भक्त येतात यांची सेवा तुम्ही मनसेच्या वतीने करा तुम्हाला काही मदत लागली तर मला कळवा अशी साहेबांनी आपुलकीने व मायेने सांगितले व कोरोना काळात केलेल्या कामासाठी शाबासकी दिली.

आळंदी देवाची शहराच्या वतीने खेड तालुका उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, आळंदी शहर अध्यक्ष निलेश घुंडरे पा., आळंदी शहर संघटक बाळु नेटके, आळंदी शहर सचिव प्रसाद बोराटे,आळंदी शहर उपाध्यक्ष किरण नरके यांनी मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांचा शाल श्रीफळ व माऊलीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मनसेचे नेते अमितजी राजसाहेब ठाकरे ,मनसे नेते बाळाभाऊ नांदगावकर, मनसे सरचिटणीस रिटाताई गुप्ता,रस्ते आस्थापनाचे अध्यक्ष योगेशजी परूळेकर, सरचिटणीस योगेशजी चिले,सरचिटणीस हेमंतभाऊ संभुस यांची भेट घेण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे, रस्ते आस्थापनाचे जिल्हा अध्यक्ष सचिनभाऊ भांडवलकर, जिल्हा अध्यक्ष जगदीशभाऊ वाल्हेकर,जिल्हा संघटक अभय वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत रस्ते आस्थापनाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय परदेशी, महिला आघाडीच्या संयोगिता परदेशी,सिमाताई येळवंडे,नम्रता ताई वरुटे आळंदी शहरातील महाराष्ट्रसैनिक, खेड तालुक्यातील महिला आघाडी, महाराष्ट्रसैनिक व तळेगांव शहरातील महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते याबाबतचे नियोजन खेड तालुका उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, आळंदी शहर अध्यक्ष निलेश घुंडरे पा., आळंदी शहर संघटक बाळु नेटके, शहर सचिव प्रसाद बोराटे, शहर उपाध्यक्ष किरण नरके यांनी केले.

Previous articleगुन्हेगारी,समाजविघातक प्रवृत्तीना धडा शिकवणार-पोलीस निरीक्षक नारायण पवार
Next articleदिपावलीच्या सणा निमित्ताने गर्दी होणार याबाबत काळजी घ्यावी-सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी