जबरी चोरी करणारे दोन सराईत पोलिसांच्या जाळ्यात

Ad 1

गणेश सातव,वाघोली पुणे

लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं 935/2019 भा.द.वि कलम 392,34 प्रमाणे दि 17/10/2019 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी उर्मिला राजाराम झेंडे वय 35 वर्ष(रा.आपटी,ता.शिरूर,जि.पुणे) या वाघोली येथील बाजार तळाजवळील पाण्याच्या टाकीजवळून
त्यांचे घराकडे जात असताना अचानक पाठीमागून मोटार सायकल वरून आलेल्या तीन इसमांनी तिच्या गळ्यातील मनी मंगळ सूत्र हिसकवले व पुढे जाऊन वैभव मुकुंदराव डोंगरे (वय-20 वर्षे)रा. गणेश नगर,वाघोली,पुणे यांचे हातातील विवाे कंपनीचा मोबाईल हिसकवला असा एकूण 65,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून धूम ठोकली.

 

याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्याचा गुन्हे शोध पथक कसून तपास करीत होते.दि 21/10/2020 रोजी तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील समीर पिलाने यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्याने व गुप्त बातमीदरमार्फत आरोपींची माहिती मिळवली.यातील संशयित इसमास गुन्हे शोध पथकाने जेजुरी येथे वेषांतर करून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव जयकाल गिरण्या गुदडावत वय 19 वर्षे,(रा. वढु खुर्द, ता हवेली, जि पुणे )असे सांगितले. तसेच सदर गुन्हा त्याचा साथीदार आरमान प्रल्हाद नानावत याचेसोबत केलेबाबत सांगितले. म्हणून वढु खुर्द येथे सापळा रचून आरमान प्रल्हाद नानावत वय 23 वर्षे,( रा. वढु खुर्द, ता हवेली, जि पुणे) यास ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपींकडून गुन्ह्यातील दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून लोणीकंद पोलीस ठाणे कडील गु र नं 923/2019 भा द वी कलम 392,34 व भोसरी MIDC पोलीस ठाणे कडील 656/2019 भा द वी कलम 392,34
हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरमान प्रल्हाद नानावत हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेवर यापूर्वी देखील लोणीकंद,भोसरी,चंदननगर, वाकड पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचे एकूण 07 गुन्हे दाखल आहेत.

 

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील,पोलीस निरीक्षक प्रताप मानकर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
सहा.पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे,पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर,गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे,श्रीमंत होनमाने,दत्ता काळे,समीर पिलाने,ऋषिकेश व्यवहारे,संतोष मारकड,सूरज वळेकर,संतोष कुलथे यांनी केली आहे.