७०० लीटर हातभट्टीची दारु विक्रीसाठी घेऊन जाणारी सॅन्ट्रो कार लोणी काळभोर पोलीसांनी पकडली

अमोल भोसले,उरुळी कांचन

 गावठी हातभट्टीची तयार दारु शहरात विक्रीसाठी घेऊन जाणारी सॅन्ट्रो कार लोणी काळभोर पोलीसांनी पकडली असून त्यामध्ये ७०० लीटर दारु मिळून आली आहे. कार व दारु असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी जॉनी व्यंकट राठोड ( वय ३५, रा. शिंदवणे, काळे शिवार, ता.हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार गायकवाड यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे जॉनी राठोड हा सॅन्ट्रो कार मधून गावठी हातभट्टीची तयार दारु शिंदवणे येथुन हडपसर येथे विक्रीसाठी घेऊन जाणार आहे अशी पक्की बातमी मिळाली होती. पोलीस निरीक्षक बंडगर यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, संदीप कांबळे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, रुपेश भगत, रोहिदास पारखे व मारुती बाराते यांना बोलावून मिळालेल्या बातमी प्रमाणे छापा टाकुन कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले.

           कारवाई करण्यासाठी सदर पथक पुणे सोलापुर महामार्गावरुन उरुळी कांचनचे दिशेने जात असताना गायकवाड यांनी गुप्त बातमीदाराकडूून राठोड हा त्याची सॅन्ट्रो कार घेवुन सोरतापवाडी फाटयाचे पुढे आला असल्याची माहीती मिळाली. यामुळे पथकाने कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अनिषा गार्डन हॉटल समोर सोलापूूूर – पुणे महामार्गावर सापळा रचला. व येणाऱ्या वाहनांची तपासणी करु लागले. रात्री ८ – ४५ वाजण्याच्या सुमारांस सोलापुर बाजुकडुन एक ह्युंदाई कंपनीची सॅन्ट्रो कार नंबर एमएच १२ डीवाय १०८७ ही येताना दिसल्याने सदर वाहनास पोलीसांनी अडथळा निर्माण करुन अडवले. तपासणी केली असता कारचे पाठीमागील सिट काढलेले व तेथे काळे व निळे रंगाचे दारुचे कॅन मिळुन आले. त्या ३५ लिटर मापाच्या २० कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर गावठी हातभट्टीची अशी एकून ७०० लीटर तयार दारु भरलेली होती. पोलीसांंनी सदर दारुसह कार असा एकूण ४ लाख३५ हजार रुपये किंमतीचा माल जप्त करून जॉनी राठोड याला अटक केली आहे.

Previous articleजबरी चोरी करणारे दोन सराईत पोलिसांच्या जाळ्यात
Next articleकामगार तथा उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह