विक्रीसाठी आणलेला २८ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन –

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या सरावलेल्या २ आरोपींना अटक त्यांच्या सुमारे 4 लाख 20 हजार रु किमतीचा 28 किलो गांजा तसेच एक चारचाकी कार असा एकूण 8 लाख 20 हजार रुपये चा माल जप्त करण्यात आला. आज (दि. २७ )रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख याजकडून अवैध धंदे यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते .

वरील आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते .

या पथकास गोपनीय बातमी दारा मार्फत एक गाडी नं एम एच १२ क्यू ए ४४७९ पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये अवैध रित्या गांजा वाहतूक होणार असल्याचे सांगितले सदर बातमीची खात्री करुन थेऊर ते नायगाव पेठ मार्गे उरुळी कांचन रेल्वे लाईन पलीकडे रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला बातमीदार यांनी संगितले प्रमाणे वरील नंबरची पांढऱ्या रंगाची कार आलेवर सदर पथकाने गाडी ताब्यात घेतली असता सदर गाडीत 2 इसम मिळून आले सदरच्या गाडीत मागच्या डिकी मध्ये पांढऱ्या रंगाचे पोते मिळून आले पोत्यात असलेला पदार्थ गांजा असलेची खात्री झालेवर सदरचे 2 इसम यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव तानाजी शंकर डुकळे (वय २९ वर्षे ,रा कोलवडी माळवाडी(ता. हवेली) , शिवाजी शंकर डुकळे (वय ३२  रा.कोलवडी माळवाडी.ता. हवेली) यांना ताब्यात घेतले असता सदरचा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले सदरच्या आरोपीकडून खलील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत ४ लाख 20 हजार किंमतीचा 28 किलो गांजा ,एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजूकी कंपनीची चार लाखाची स्विफ्ट डिझायर असा एकूण ८ लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन इन डी पी एस ऍक्ट कलम ८(क) २० (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे .

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पो.उप निरीक्षक शिवाजी ननावरे , सहा पो फो दत्तात्रय गिरमकर, पो हवा राजेंद्र पुणेकर, पो हवा उमाकांत कुंजीर , पो हवा महेश गायकवाड, पो हवा निलेश कदम, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळके, पो.ना राजू मोमिन ,पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे .