रोहित पवार यांनी व्यावसायाबद्दल मार्गदर्शन करून जिंकली पाटसकरांची मने

सचिन आव्हाड

कोणताही व्यवसाय छोटा – मोठा नसतो , कोणताही व्यवसाय सुरू केल्यानंतर लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नसतो , आपले आई वडील सहमत असतील तर व्यवसाय करायला हरकत नाही .असा मौलिक सल्ला कर्जत – जामखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी पाटस गावातील युवकांना दिला .पाटस गावातील शुभम खाडे आणि करण खाडे यांच्या खाडे इलेक्ट्रिकल या दुकानाचा शुभारंभ रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला . यावेळी रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधला .व्यवसाया बाबत मार्गदर्शन करून पाटस परिसरातील युवकांची मने जिंकली .

यावेळी सत्वशील शितोळे, शिवाजी बापू ढमाले ,संपत भागवत, लहू खाडे,सुरज होले,रवी सायकर,आबा गुळवे,नारायण सायकर, जाकीरभाई तांबोळी ,गणेश रंधवे आणि मनोत्रीशा इस्टेट चे मालक राहुल आव्हाड यांसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते .

पुढे बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की , व्यावसाय सुरू करताना धाडस करणे महत्वाचे आहे . अडचणी येत असतात . मात्र या अडचणींवर मात करत पुढे जायचं असत . या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व युवकांनी आदर्श घेऊन व्यावसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .

राज्यातील तरुण कार्यक्षम आमदार रोहित पवार यांची तरुण वर्गात मोठी क्रेझ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे . पाटस येथे रोहित पवार येणार असल्याची माहिती कळताच मोठ्या संख्येने तरुण जमले होते . रोहित पवार यांच्या सोबत तरुणांनी सेल्फी घेत सोशल मोडियावर सेल्फी व्हायरल केले .

Previous articleधामणे शाळेत टॅब देऊन शिष्यवृत्ती गुणवंतांचा सन्मान
Next articleकोरोना कवच विम्याचे’ मुळशीतील पत्रकारांना वाटप