धामणे शाळेत टॅब देऊन शिष्यवृत्ती गुणवंतांचा सन्मान

राजगुरूनगर-धामणे (ता.खेड) प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट सिटीकडून टॅब देऊन सन्मानित करण्यात आले.

धामणे शाळेमध्ये गेल्यावर्षी सुरु झालेली शिष्यवृत्ती यशाची परंपरा अखंड चालवत यावर्षीही तीन विद्यार्थी गुणवंत ठरले अहेत. या यशाची दखल घेऊन गुणवंतांचा गुणगौरव आणि सद्यस्थितीत ऑनलाइन अभ्यासासाठी पूरक ठरणारे साधारण दिड लाख रुपये किमतीचे २५ टॅब पुणे स्पोर्ट सिटी रोटरी क्लबने दिले.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष मनोजित चौधरी, माजी अध्यक्ष विनोद पाटील, संदेश सावंत, नितीन जोशी यावेळी उपस्थित होते.

धामणे शाळेतील सुमेध रमेश बच्चे, ज्ञानेश्वरी अरुण शिवेकर, देविका सोमनाथ कोळेकर, आकांक्षा विकास कोळेकर व साक्षी तानाजी बारवेकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा टॅब देऊन रोटरियन्सच्या हस्ते प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक अमर केदारी यांचा विशेष सत्कार झाला.


यावेळी प्रा.तानाजी कोळेकर, काळूराम गिर्‍हे, सोपानराव कोळेकर, रमेश बच्चे, पै.सतिश कोळेकर, संभाजी गिर्‍हे, गंगाराम कोळेकर, अनिल बोर्‍हाडे, मारुती जरे, अमर केदारी, मंगल निमसे, उषा कोळेकर, पल्लवी कोळेकर, गणेश काळे, संतोष वाघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी केले.तर आभार मारुती जरे यांनी मानले.

Previous articleबाबाजी कोरडे यांचा एमडीआरटी पुरस्काराने गौरव
Next articleरोहित पवार यांनी व्यावसायाबद्दल मार्गदर्शन करून जिंकली पाटसकरांची मने