निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी अहोरात्र झटणारी नवदुर्गा कल्याणीताई पवार

कल्याणी ताई पवार यांचे माहेर खेड तालुक्यातील पूर येथील असून त्यांना तरुण वयापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली होती.समाजासाठी आपण काहीतरी करावे यासाठी त्यांनी दहा वर्षापूर्वी द्वारका सेवा सदन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू केले आहे.

समाजात अनेक निराधार वृद्ध महिला,पुरुष,असून त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करावे या भावनेतून त्यांनी दहा वर्षापूर्वी द्वारका वृद्धाश्रम सुरू केले कोणतीही शासकीय मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर त्यांनी आज पर्यंत वृद्धाश्रम सुरू ठेवले आहे.तसेच वृद्धाश्रमात असलेले वृद्ध महिला व पुरुष यांच्या हाताला त्या काम ही देत आहेत. कल्याणी पवार या स्वतः पदवीधर डॉक्टर असून इतर सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात. अडचणीत असलेल्यांना मदत करणे, ज्येष्ठांना शासकीय सुविधा, आरोग्य सुविधांचे व कायदेशीर मार्गदर्शनही त्या नेहमी करत असतात त्यांच्या आश्रमात अनेकदा घरगुती वाद झाला म्हणून ज्येष्ठ येत असतात या ज्येष्ठांना सामोपचाराने समजावून व त्यांच्या कुटुंबियांना समजावून अनेक कुटुंबाची भांडणे त्यांनी सोडवले आहेत.

द्वारका आश्रमातील वृद्ध पूर्वी जेवणाचे डबे बनवण्याचे काम करत होते त्यातून त्यांना थोडाफार रोजगार मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खेड तालुक्यातील अनेक कंपन्या बंद असल्याने यांचा रोजगार बंद झाला आहे. सध्या या वृद्धाश्रमात 12 वृद्ध असून समाजातील दानशूर व सामाजिक संघटनांकडून मदतीची अपेक्षा पवार यांनी केली आहे.

महिला असूनही गेल्या दहा वर्षापासून त्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांची सेवा करत आहेत त्यांना अनेकदा अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करत त्यांनी ही सेवा सुरू ठेवली आहे.त्यांचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी असून त्यांचे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. स्त्रीशक्तीची उपासना स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून साजरा केला जाणारा नवरात्र उत्सव या उत्सवानिमित्त कल्याणी ताई पवार व त्यांच्या सारख्या नवदुर्गा महिलांचा समाजाने सन्मान करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Previous articleहॉटेल मराठा फॅमिली रेस्टॉरंट दुसऱ्या शाखेचे उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन
Next articleहॉटेल मराठा फॅमिली रेस्टॉरंट च्या दुसऱ्या शाखेचे उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन