पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार

अमोल भोसले,उरुळी कांचन

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय बारामती, इंदापूर येथील भगवानराव भरणे प्रतिष्ठान, दौंड येथील दौंड शुगर, भोर येथील कै. शिवाजीराव शिवतरे प्रतिष्ठान,धनकवडी येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रावलक्ष्मी फाउंडेशन शिरूर,अहमदनगर येथील निलेश लंके प्रतिष्ठान, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन,कर्जत यांना या रुग्णवाहिका मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार निलेश लंके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleपरीक्षांच्या गोंधळावर वेळीच लक्ष द्या अन्यथा राज्यभर धरणे आंदोलन करणार-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा इशारा
Next articleखासदार सुप्रिया सुळे यांनी सणसरला भेट देऊन नुकसानीची केली पाहणी