खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसरला भेट देऊन नुकसानीची केली पाहणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसानग्रस्त भागातील सणसर गावाला आज खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली.

दरम्यान नुकसानीची पाहणी करुन झाल्यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दिली.