जमिनीच्या वादातून दोन गटात लोंखंडी पाईप,कोयत्याने तुफान हाणामारी

प्रमोद दांगट, निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे घरासमोर सांडपाण्याची चारी काढण्याच्या तसेच जमिनीच्या वादावरुन दोन गटात लोखंडी पाईप, कोयत्याने तुफान हाणामारी झाली.हाणामारीत ९ नागरिक जखमी झाले आहे.दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादिनुसार ११ जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक हनुमंत नेटके,सुनील हनुमंत नेटके,दादा सुनील नेटके,गुल्या सुनील नेटके,वंदना उनवणे,हनुमंत नेटके यांची पत्नी पूर्ण नाव माहीत नाही ,वंदना उनवने हिचे पती, मुलगा यांनी जमिनीच्या वादाच्या कारणावरुन यातील दिपक नेटके यांनी कोयता मंगेश नेटके यांच्या उजव्या हाताच्या पंजावर मारुन दुखापत केली.मंगेश नेटके यांचा मुलगा चेतन हा सोडवण्यास आला असता सुनील नेटके याने मंगेश नेटके आणि मुलगा चेतन यांना लोखंडी पाईपने मारहाण केली.इतरांनी मंगेश नेटके यांंचे वडील वामन,पत्नी रीना,मुलगी नंदिनी यास काठीने,लाथाने हाताबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच मंगेश नेटके यांच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान करुन निघून गेला आहे .याप्रकरणी मंगेश वामन नेटके( वय ४२) यांनी दिपक हनुमंत नेटके,सुनील हनुमंत नेटके,दादा सुनील नेटके,गुल्या सुनील नेटके,वंदना उनवणे,हनुमंत नेटके यांची पत्नी पूर्ण नाव माहीत नाही,वंदना उनवने हिचे पती आणि मुलगा पुर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार पेठ-नेटके वस्ती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान कैलास कड करत आहे.

तर सुरेश नाना उनवणे यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे कि नेटकेवस्ती येथे वामन किसन नेटके,मंगेश वामन नेटके,चेतन मंगेश नेटके यांनी संगनमत करुन सांडपाणी आणि चारीच्या कारणावरुन चिडुन जावुन जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच शिविगाळ करुन चेतन नेटके यांनी संदेश याच्या पाठीवर काठीने,वामन नेटके यांनी अक्षय नेटके यांच्या डोक्यावर आणि अनिकेत नेटके यांच्या हातावर कोयत्याने मारहाण केली.मंगेश नेटके यांनी सुरेश उनवणे यांच्या पाठीवर,दिपक नेटके यांच्या हातावर आणि छातीवर ,संदेश याच्या बोटावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत केली आहे.संबधितांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सागर खबाले करत आहे.

Previous article२४ वर्षीय तरुणाचा खून करून खेड घाटात टाकणाऱ्या चार आरोपींना खेड पोलिसांनी दोन तासात ठोकल्या बेड्या
Next articleएक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा टेक्निशियने केला विनयभंग