२४ वर्षीय तरुणाचा खून करून खेड घाटात टाकणाऱ्या चार आरोपींना खेड पोलिसांनी दोन तासात ठोकल्या बेड्या

राजगुरूनगर,प्रमोद दांगट

दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून 24 वर्षीय तरुणाचा खून करून त्याला खेड घाटात टाकून त्याच्या अपघाताचा बनाव करणाऱ्या चार आरोपींना खेड पोलिसांनी दोन तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. ७ रोजी) रात्री अडीच वाजेच्या सुमारास मयुरेश एरंडे ( वय वर्षे 24,रा.थुगाव (ता. आंबेगाव,जि. पुणे) याचा आरोपी आदित्य बबन नवले (रा. शिवाजी चौक देवकी प्लाजा मंचर ) गणेश भास्कर वाबळे ( रा. संभाजी चौक,मांगवाडा, मंचर ) साहिल अंबादास सुरवसे रा.निघोटवाडी ता.आंबेगाव पुणे),सोन्या उर्फ आनंद सुधीर नाटे (रा. मंचर ता.आंबेगाव ) यांचे बरोबर मंचर गावच्या हद्दीत असलेल्या बुवासाहेब मंदिराच्या टेकडीवर दारू पिताना शाब्दिक बाचाबाची झाली होती यामध्ये मयुर याने आरोपी आदित्य बबन नवले यांच्या कानाखाली मारल्याच्या कारणावरून त्यांनी तू कानाखाली का मारली असे म्हणून त्याला लाकडी दांड्याने व लोखंडी खोऱ्याने डोक्यात गंभीर मारहाण करून त्याचा खून केला. हा अपघात आहे असे भासविण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला मयत मयूर याला चार चाकी गाडीत घालून व त्याची मोटरसायकल घेऊन खेड पोलीस ठाणे हद्दीतील खेड घाटात त्याची मोटर सायकल व मयतची बाँडी पुणे नाशिक हायवे रोड वरील घाटात वळणावर उताराच्या बाजूला टाकून दिली.

सदर घटनेची माहिती खेड पोलिसांना मिळतात खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते व खेड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या पथकाने तपासात सुरुवात करून दोन तासाच्या आत गुन्ह्याचा उलगडा करून गुन्ह्यातील चार आरोपींना तात्काळ अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नवनाथ थिटे, शंकर भवारी , पोलीस नाईक सुदाम घोडे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर भोईर, निखिल गिरीगोसावी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वडेकर यांनी महत्त्वाची मदत केली.

Previous articleडॉ.संग्राम डांगे व डॉ.विष्णू मुंडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान
Next articleजमिनीच्या वादातून दोन गटात लोंखंडी पाईप,कोयत्याने तुफान हाणामारी