गरिबी निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी मिलिंद शेंडगे तर पुणे जिल्हाध्यक्षपदी राहुल झेंडे यांची निवड

सचिन आव्हाड,दौंड

गरिबांच्या न्यायिक हक्कासाठी लढणाऱ्या व त्यांना आर्थिक उन्नतीसाठी मदत मिळवून देणाऱ्या अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी मिलिंद शेंडगे यांची तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी राहुल झेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या संबंधीचे नियुक्ती पत्र समितीचे संस्थापक व अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.

जागतिकीकारणामुळे व आर्थिक सुधारणांमुळे देशाचा विकास होत आहे. असे जरी असले तरी याचा लाभ देशातील मूठभर लोकांनाच होत आहे. यामुळे गरीब अधिकच गरीब होत आहे. यामुळे गरीब लोकांचे जीवनमान शैक्षणिक व आर्थिक दृष्टीने प्रगतिशील बनविण्यासाठी समिती कार्यरत राहणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात काम करताना गरीब, दीनदुबळ्या लोकांशी संपर्कात आल्यानंतर त्यांचे खरे प्रश्न व समस्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना त्यांचा न्यायिक हक्क व अधिकार मिळवून देण्याकरिता मिलिंद शेंडगे यांनी सदर समितीचे उपाध्यक्ष पद स्विकारले. तसेच अनेक सामाजिक संघटनांसोबत काम करत असताना समाजसेवेचे व्रत घेतल्याने व गरिबांचा कळवळा असल्याने राहुल झेंडे यांनी सदर समितीच्या संपर्कात येऊन या माध्यमातून गरिबी निर्मूलनाचा विडा उचलला आहे. समितीची ध्येय धोरणे व उद्दिष्ट्ये समोर ठेवून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा मानस राज्याचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.
समितीचे संस्थापक व अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही समितीचा विस्तार करून सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन गरीब वंचित समूहाला न्याय मिळवून देणार असल्याबाबत पुणे जिल्हाध्यक्ष राहुल झेंडे यांनी माहिती दिली.

Previous articleबैलगाडा शर्यत तात्काळ सुरू करा – खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी
Next articleरोटरी सॅटेलाईट क्लब ॲाफ पुणे बावधन इलाइट पाटस या संघटनेचे आज पाटस येथे उद्घाटन