रोटरी सॅटेलाईट क्लब ॲाफ पुणे बावधन इलाइट पाटस या संघटनेचे आज पाटस येथे उद्घाटन

Ad 1

सचिन आव्हाड,दौंड

रोटरी सॅटेलाईट क्लब ॲाफ पुणे बावधन इलाइट पाटस या संघटनेचे आज पाटस येथे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास वैद्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेंद्र बाबा शितोळे, क्लब च्या सल्लागार स्मिता शितोळे, क्लबचे विद्यमान चेअरमन राजेश सोनवणे, सचिव पूजा दिवेकर, खजिनदार अजितसिंह शितोळे व सर्व सदस्य उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी क्लबचे सदस्य उद्योजक शहाजी ढमाले यांच्या वतीने गरजू व्यक्तींना, कोविड सेंटर व सरकारी हॉस्पिटल कर्मचारी या सर्वांना मास्क वाटप करण्यात आले. सर्व सदस्याना रोटरीचे किट, प्रमाणपत्र पाहुण्याच्या हस्ते वाटप करण्यात आले. सॅटेलाईट रोटरी क्लबच्या वतीने पाटस गाव व परिसरामध्ये विविध समाज उपयोगी कामे करण्याचा मानस केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मितादेवी शितोळे, सूत्रसंचालन उत्तम रुपनवर सर तर आभार चेअरमन राजेश सोनवणे यांनी मानले.

Previous articleगरिबी निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी मिलिंद शेंडगे तर पुणे जिल्हाध्यक्षपदी राहुल झेंडे यांची निवड
Next articleकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणीकंदमध्ये आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम अंतर्गत तपासणी