“माझे कुटुंब माझी जबाबदारी”योजनेचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वडगाव रासाई आणि मांडवगण फराटा येथे कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या प्रभावी योजनेची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी आमदार अशोक पवार घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या कोवीड योद्ध्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आमदार अशोक पवार आणि सुजाता पवार यांनी स्वतः काही लोकांचे बॉडी टेंपरेचर व ऑक्सिजन लेव्हल चेक करुन या योजनेची सुरुवात केली.

यावेळी बीडीओ विजय नलावडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिंदे, घोडगंगा कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, मांडवगणचे सरपंच कदम अण्णा, वडगाव रासाई सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव शेलार, वैद्यकीय आधिकारी डॉ.सातपुते, डॉ.रोहिणी दरेकर, इसवे मॅडम, ग्रामविकास आधिकारी आर.डी.रासकर, आरोग्य सेवक बी.ए.झिरे, झोनल ऑफिसर ठोंबरे सर , मुख्याध्यापक दिवे सर आदी उपस्थितीत होते.