मंडलधिकारी आणि तलाठ्याची दप्तर तपासणी;कामात अनेक आढळल्या त्रुटी

वाघोली-(ता:हवेली) येथील मंडलाधिकारी आणि गाव तलाठी यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई आणि फेरफारात अफरातफर  झाल्याचा आरोप करत माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे आणि गाव तलाठी बाळासाहेब लाखे यांचे दप्तर तपासणी करुन शिस्तभांगाची कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी आणि हवेली तहसीलदार यांच्याकडे लेखी पञाद्वारे केली होती.मात्र हवेली महसुल विभागाकडून  दप्तर तपासणी साठी सात महिन्यापासून यामध्ये  वेळकाढूपणा करण्यात येत होता.अखेर हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी तात्काळ नोटीस काढून दोन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास झालेल्या विलंबाबाबत खुलासा मागिवताच  याची तात्काळ  दखल घेऊन निवासी नायब तहसीलदार सुरेश पाटिल ,महसुलचे नायब तहशिलदार संजय भोसले  यांच्यासह सात जणांच्या पथकाने  मंडलाधिकारी किशोर शिंगोटे आणि गाव तलाठी बाळासाहेब लाखे यांच्या दप्तराची तपासणी करून अहवाल सादर केला आहे.
यामध्ये अनेक प्रकारच्या ञुटी आढळून आल्या असून यामध्ये डॅशबोर्ड वरील प्रमाणित नोंदी दिसून आल्या नाहीत,कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचा बोर्ड लावण्यात आला नाही,माहिती अधिकाराचा बोर्ड नाही,शासकीय जमीन भागातील गायरान जमीन अतिक्रमणाची अद्यावत नोद माहीती नाही अशा सह अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आले आहेत.तर अंदाजे सहाशे ते सातशे फेरफार बाबत यामध्ये माहिती देखील देण्यात आलेले नाही,तर १३३ नोंदी अनेक महिन्यापासुन अपुरे पेपरचे कारण देत ‘अर्थ’ कारणासाठी प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबतची कारणे चुकीची देऊन तपास आधिकार्यांची दिशाभुल करण्यात आली आहे, हस्तलिखीत सातबारा व डी.एस.सी.चा ताळमेळच  बसत नसल्याचेही तपास आधिकारी यांनी नमुद केले आहे,त्यामुळे चंद्रकांत वारघडे यांनी या दप्तर तपासणी वर देखील आक्षेप घेतला असून महसूलच्या भ्रष्ट मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालण्याचे काम महसूल अधिकारी करत असल्याचा आरोप चंद्रकांत वारघडे यांनी केला. यामध्ये अनेक गोरगरीब सर्वसामान्याचे लाखो रुपये घेऊन  भ्रष्ट अधिकार्‍यांनी खूप मोठ्या प्रमाणात माया जमा केल्याचा ही आरोप चंद्रकांत वारघडे यांनी केला आहे.
महसुल विभागाने तात्काळ या मंडलधिकारी आणि तलाठी यांच्यावर कादेशीर कारवाई करावी अन्यथा माहिती सेवा समितीच्या वतीने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात राज्यभर तहशीलदार कार्यल्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे -चंद्रकांत वारघडे,अध्यक्ष माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य
Previous article“माझे कुटुंब माझी जबाबदारी”योजनेचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते शुभारंभ
Next articleचाकण शहर राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विविध समस्यांचे निवेदन