गणेश बोत्रे मित्र परिवारातर्फे महाळुंगे कोविड सेंटरला पाण्याच्या बॉटल

Ad 1

 चाकण-खालुम्ब्रे येथील युवानेते गणेश बोत्रे व मित्र परिवार यांनी पुन्हा एकदा कोविड योद्धा म्हणून काम करताना महाळुंगे येथील म्हाडा कोविंड सेंटरला १२०० मिनरल पाणी बॉटल्स दिल्या आहेत.

त्यांना यासाठी नितीन गाडे व सुधीर गाडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.म्हाडा कोविड सेंटर मधील वैद्यकीय अधिकारी अपेक्षा बोरकर व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पारासुर यांच्याकडे या १२०० पाणी बॉटल्स राजु गाडे,अक्षय पवार, नितीन बोत्रे, दशरथ बोत्रे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.