कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील भोर बी बियाणे राबवत आहे शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

बाबाजी पवळे, चाकण : कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे औषधांची व खतांची घरपोच सुविधा मिळावी म्हणून चाकण येथील भोर बी बियाणे यांनी सदैव शेतकऱ्यांसाठी तत्पर  शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर शेतमालासाठी लागणारे बि, बियाणे,औषधे ,खते ,वॉटर सोल्युबल आदींची फ्री डिलिव्हरी सुरू केली आहे तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पिका विषयी विविध मार्गदर्शनही दिले जात आहे.

 

भोर बी बियाणे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी कौतुक केले असून त्यांना या उपक्रमामुळे घरपोच खते औषधे मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous articleगणेश बोत्रे मित्र परिवारातर्फे महाळुंगे कोविड सेंटरला पाण्याच्या बॉटल
Next articleनगरसेविका करूणाताई चिंचवडे प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर !!