ह.भ.प. माणिक(आबा) रामभाऊ कासुर्डी यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ सप्ताह व दिंडी कमिटी दौंड तालुका उपप्रमुखपदी निवड

अमोल भोसले – उरुळी कांचन

माणिकआबा रामभाऊ गायकवाड हे १९९० पासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपूर पायीवारी करतात.भुलेश्वर प्रासादिक दिंडी नंबर ४५ चे ते उपाध्यक्ष देखील आहेत. कासुर्डी व पंचक्रोशीतील सर्व धार्मिक कार्यक्रम,सप्ताह दिंडी मध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो.पुणे विभागीय सदस्य हभप.दत्तात्रय महाराज सोळसकर यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली व त्यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ सप्ताह व दिंडी कमिटी तालुका उपप्रमुख पदी निवड झाली. वारकरी सांप्रदायाच्या व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या धोरणाने, नियमाने असेच पुढे कार्य करीत राहणार असल्याचे मत हभप.माणिक (आबा) गायकवाड यांनी व्यक्त केले.

Previous articleकोरोनाची चाचणी करण्यासाठी घरी येणाऱ्या आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आवाहन
Next articleपश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प.आनंद महाराज तांबे यांची निवड