कोरोनाची चाचणी करण्यासाठी घरी येणाऱ्या आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आवाहन

Ad 1

राजगुरूनगर-खेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना आजारामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. खेड तालुक्यात अनेक कंपन्या असल्याने येथील नागरिकांची मोठी ये जा होत असते त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.

 

या पार्श्वभूमीवर कोरोना आजाराला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण खेड तालुक्यात व महत्त्वाच्या शहरांमध्ये दि १६ व १७ रोजी माझे कुटूंब माझी जबाबदारी ह्या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन लक्षणे असलेल्या नागरिकांची प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व सर्वांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केले आहे.

आंबेगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे कोरोना रुग्ण लवकरात लवकर सापडून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत आहे.त्याचप्रमाणे आता खेड तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येणार असून खेड तालुक्यातील महत्वाची शहरे असलेल्या चाकण राजगुरुनगर या शहरात कोरोना लक्षणे असलेल्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. यासाठी प्रशासन आरोग्य सेवक आरोग्य अधिकारी या सर्वांना दि .१६ व १७ रोजी नागरिकांनी सहकार्य करावे व कोरोना पासून दूर राहावे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आव्हान खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केले आहे

जाहिरात